अधिकारी, कर्मचारी विदेशवारीवर मंजूरीवरून संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - एकीकडे महिन्याचा पगारास थोडा उशीर झाल्यास ओरड करणारे जिल्हा परिषदतील विविध विभागातील 20 ते 25 अधिकारी व कर्मचारी विदेशवारीवर गेल्याची माहिती आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात हे सर्वजण गेल्याची चर्चा आहे. याच्या सोबत एक कंत्राटदार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. 

नागपूर - एकीकडे महिन्याचा पगारास थोडा उशीर झाल्यास ओरड करणारे जिल्हा परिषदतील विविध विभागातील 20 ते 25 अधिकारी व कर्मचारी विदेशवारीवर गेल्याची माहिती आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात हे सर्वजण गेल्याची चर्चा आहे. याच्या सोबत एक कंत्राटदार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून भ्रष्टाचारास आळा घालण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी अनेक उपययोजना त्यांनी केल्या. रात्रीच्या सुमारास अधिकाऱ्यांचा कार्यालयास थांबण्यास मनाई केली. तक्रार येताच चौकशी लावून अनेकांवर निलंबाची कारवाई केली. मात्र अनेकांनी भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग शोधून काढल्याची चर्चा आहे. काही अधिकारी, कर्मचारी विदेशवारीवर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या वारीत मोठ्या संख्येने बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग सहभागी आहे. त्याचबरोबर वित्त, पंचायत आणि इतरही विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वारीबद्दल अख्या जिल्हा परिषदेत सद्या चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे चतृर्थ श्रेणीचे कर्मचारी यात असल्याचे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

ही वारी "सेटींग'ची असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी विदेशात जावू नये, असा काही नियम नाही. परंतु विदेशात जातांना कार्यालयाला अधिकृत माहिती देणे गरजेचे आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा अर्ज कार्यालय प्रमुखाला दिला आहे. परंतु, विदेशवारी संदर्भात आवश्‍यक परवानगी सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेतली नसल्याची चर्चा आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परवानगी संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

कर्मचाऱ्यांना हक्‍काच्या सुट्ट्या असतात. आर्थिक वर्ष संपल्यामुळे विभाग प्रमुखांनी त्या मंजुरही केल्या आहेत. परंतु त्यांच्या सुट्टीच्या अर्जात देश सोडून जात असल्याचा उल्लेख नाही. शासकीय नियमानुसार त्यांनी विदेशात जाण्याचा उल्लेख करायला हवा होता. परंतु त्यांनी तो केला नाही. ही प्रशासनाची दिशाभूल असून हे चुकीचे आहे. 
-शरद डोणेकर, उपाध्यक्ष व सभापती बांधकाम विभाग 

Web Title: Confusion over officers employees foreign approvals