Vidhan Sabha 2019 : वणीत कॉंग्रेस उमेदवार देरकर की कासावार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : वणी विधानसभा मतदारसंघात अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून माजी आमदार व कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार वामनराव कासावार यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक खासदारांचे खास म्हणून ओळखले जाणारे संजय देरकर यांनीही कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने जाहीर केलेल्या यादीत माजी आमदार वामनराव कासावार यांना उमेदवारी दिली. तसेच त्यांना एबी फॉर्मही पाठविला. त्यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार (ता.5) संजय देरकर यांनी कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यांनी दोन अर्ज भरले असून एक अपक्ष व एक कॉंग्रेसतर्फे भरला. त्यामुळे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्‍न मतदारांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीपासून या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर निवडून आले. त्यांच्या विजयात संजय देरकर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी वणीची उमेदवारी संजय देरकर यांना देण्यात यावी, यासाठी दिल्ली दरबारी आपले वजनही वापरले. परंतु, त्यांना यश आले नाही. पक्षाने माजी आमदार वामनराव कासावार यांना उमेदवारी दिल्यामुळे खासदार धानोरकर यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. परंतु, संजय देरकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वणीची उमेदवारी वेळेपर्यंत बदलणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

वामनराव कासावार यांना पक्षांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाने "एबी' फार्म त्यांना दिला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
- डॉ. वझाहत मिर्झा
जिल्हाध्यक्ष तथा आमदार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: confusion regarding congress candidate in wani