बदलीच्या आदेशात प्रा. खडसेंचे नाव नसल्याने संभ्रम

अनिल दंदी
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

काल बुधवार ता. २० ला बाळापूर तालुक्यातील अधीकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. यात बाळापूर तहसीलदार दिपक पुंडे यांची मारेगाव तहसील कार्यालयात तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून पुंडे यांच्या जागी अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळापूर : सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या झाल्या असून या बदल्यांच्या आदेशात बाळापूर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

काल बुधवार ता. २० ला बाळापूर तालुक्यातील अधीकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. यात बाळापूर तहसीलदार दिपक पुंडे यांची मारेगाव तहसील कार्यालयात तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून पुंडे यांच्या जागी अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर यवतमाळ येथील पुनर्वसन कार्यालयातील उपजिल्हाधिकारी रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शासनाने केलेल्या बदलीच्या आदेशात प्रा. संजय खडसे यांची बदली कुठे करण्यात आली, याचा उल्लेख नसल्याने याबाबत संभ्रम आहे.

प्रा. खडसे यांच्या बदलीने अनेकांचे डोळे पाणावले

११ नोव्हेंबर २०१६ मध्ये बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून प्रा. संजय खडसे रूजू झाले होते. शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांकडून सामान्य जनतेला मिळणार्‍या वागणुकीबाबत एकीकडे वाढत्या तक्रारी येत असतांना प्रा संजय खडसे यांनी उत्कृष्ट कार्य करून  बाळापूर व पातूर तालुक्यातील सामान्य जनतेच्या मनात एक आगळा-वेगळा ठसा निर्माण केला होता. त्यामुळेच त्यांचा सन्मान होत असल्याचे चित्र आदर्श म्हणावे लागेल.
 

Web Title: confussion because there is no name of professor sanjay khadse in exchange order