काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रस्तावित वीज दरवाढीस विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

रिलायन्स व अदानी समूहाचे नुकसान भरून काढण्यासाठी नागरिकांवर भुर्दंड लावला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याविरोधात निदर्शने केली व स्वतःला अटक करून घेतल्याने गोंधळ चांगलाच उडाला होता. 

नागपूर : प्रस्तावित वीज दरवाढीवर विद्युत नियामक आयोगातर्फे वनामती येथे आज सुनावणी घेण्यात आली. मात्र, आमदार सुनिल केदार तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीस प्रचंड विरोध दर्शवला.

रिलायन्स व अदानी समूहाचे नुकसान भरून काढण्यासाठी नागरिकांवर भुर्दंड लावला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याविरोधात निदर्शने केली व स्वतःला अटक करून घेतल्याने गोंधळ चांगलाच उडाला होता. 

Web Title: Congress Activist Opposes Electricity Rate