बार्शीटाकळी नगरपंचायतीत काँग्रेसची बाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

अकोला - ग्रामपंचायत बार्शीटाकळीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसचे महेफुज खान यांना मिळाला आहे. काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. 

अकोला - ग्रामपंचायत बार्शीटाकळीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसचे महेफुज खान यांना मिळाला आहे. काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. 

राज्यातील सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार बार्शीटाकळी ग्रामपंचायतची जागा नगरपंचायतने घेतली. त्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होय. जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुस्लिम बहुल असलेल्या बार्शीटाकळीत काँग्रेस आणि भारिप-बमसं यांच्यातच थेट लढत झाली. त्यात दोन्ही पक्षाला प्रत्येकी सहा जागा मिळाल्यात. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. त्यात भाजपला दोन जागा मिळाल्या तर शिवसेनेची पाटी कोरीच राहली. शिवसेनेला जिल्ह्यात बसलेला हा मोठा धक्का मानल्या जात आहे. १७ सदस्यांच्या नगरपंचायतमध्ये तीन अपक्ष सदस्यही निवडून आले आहेत. 

महेफुज खान नगराध्यक्ष
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आला. यात काँग्रेसचे महेफुज खान विजयी झाले. त्यांनी भारिप-बमसंचे नईमोद्दीन यांचा १६२२ मतांनी पराभव केला. काँग्रेसला ४९८६ मतं मिळाली. भारिप-बमसंच्या उमेदवाराला ३३६४ मत मिळविता आली. नगराध्यक्षपदाच्या अन्य उमेदवारांपैकी भाजपचे संजय इचे यांना १७४२, शिवसेनेचे गजानन आखाडे यांना ११८३ आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आलमगिर खान यांना ७१४ मतं मिळाली. आलमगिर खान हे काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. नगरपंचायत झाल्यामुळे त्यांचे सदस्यपद रद्द झाले होते. त्यांना काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी तिकिट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.   

Web Title: congress elected in barshitakli nagarpanchayat