कॉंग्रेस नव्या चेहऱ्यांना संधी देणार 

Congress give opportunity new faces
Congress give opportunity new faces


उमरेड/भिवापूर, (जि. नागपूर) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कॉंग्रेसने विधानसभा मतदारसंघनिहाय आखणी केली आहे. विधानसभा मतदारसंघातील उमरेडसह भिवापूर व कुही तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केले. 

नुकतीच भिवापूर येथील जिचकार सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत उमरेडचे आमदार राजू पारवे, गंगाधर रेवतकर, किरण नागरीकर, दिलीप गुप्ता, विठ्ठल राऊत, नंदा नारनवरे, सोपान दडवे, राजेद्र गारघाटे, बंडू ढाकूनकर, कृष्णा घोडेस्वार, सहादेव तांबे, प्रमोद राऊत, कुंदा कंगाले, प्रभू धनविजय, भाऊराव तलमले, बाळू इंगोले, लव जनबंधू, वर्षा ठाकरे, मंजूषा समर्थ, वंदना जांभुळे, संतोष देवाळकर, तुळशीदास चुटे, बाबा मानकर, शंकर गुप्ता यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार : राजू पारवे

आमदार राजू पारवे यांनी उमरेड विधानसभा क्षेत्रातील 10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समिती सदस्यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्ते एकजुटीने लढले, आपली मेहनत कामी आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते, त्यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com