राऊतांचा "लेटर बॉम्ब' बूमरॅंग होणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीपूर्वीच गटातटांत विभागलेल्या कॉंग्रेसमध्ये अद्यापही अशांतता असून, माजी मंत्री नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्षांविरोधातच मोर्चा उघडला. मात्र, आज शहर कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नितीन राऊत यांच्यासह माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या पक्षविरोधी कारवाईच्या चौकशीसाठी समिती पाठवा, असा ठराव प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नितीन राऊत यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे प्रदेशाध्यक्षांच्या केलेल्या तक्रारीचे पत्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्‍यता आहे. 

अंतर्गत गटबाजीमुळे महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. मात्र, त्याची जबाबदारी स्वीकारत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा पाठविला. त्यातच माजी मंत्री नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्षांनाच महापालिका निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरले होते. याबाबत त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले. मात्र, आज शहर कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठाकरे यांचा राजीनामा मंजूर करू नये, या ठरावासोबतच राऊत आणि चतुर्वेदी यांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायाची चौकशी करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने एक समिती पाठवावी, अशी मागणीही करण्यात आली. त्यामुळे शहर कॉंग्रेसने केलेली मागणी प्रदेश कॉंग्रेस मान्य करण्याची शक्‍यता आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण शहर कॉंग्रेसच्या मागणीला प्राधान्य देत राऊतांसह चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे, तिकीटवाटप करताना सर्व नेत्यांना विचारात घेण्यात आले. मात्र, राऊत, चतुर्वेदी आणि अनीस अहमद यांनी ज्यांच्या तिकिटासाठी आग्रह धरला, त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. उलट ठाकरे यांनी उमेदवारी दिलेले निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिकेत ठाकरे ठरवतील, त्याच व्यक्तीला विरोधी पक्षनेते पद द्यावे, अशी मागणीही कार्यकारिणीत करण्यात आली. 

विकास ठाकरे यांच्यामुळे कॉंग्रेसचा पराभव झालेला नाही. पराभवास अन्य काही लोक जबाबदार आहेत. याची शहानिशा करण्यासाठी पक्षाने एक समिती पाठवावी, असे निवेदन प्रदेश कॉंग्रेसला पाठविणार आहोत. ठाकरे यांचा राजीनामा मंजूर करू नये, अशी विनंती केली आहे. 
-डॉ. गजराज हटेवार, महासचिव, शहर कॉंग्रेस. 

Web Title: congress internal politics