काँग्रेसने तरुणांना हिंसा करण्यासाठी फूस लावली; आठवले यांचा आरोप

Congress invites youth to violence; Allegation of Union Minister Ramdas Athawale
Congress invites youth to violence; Allegation of Union Minister Ramdas AthawaleCongress invites youth to violence; Allegation of Union Minister Ramdas Athawale

अमरावती : अग्निपथ योजनेवरून देशात चांगलेच वादंग सुरू आहे. तरुणांपासून विरोधी पक्ष या योजनेचा विरोध करीत आहे. हा तरुणांच्या आयुष्याशी खेळ असल्याचे म्हणत आहे. मात्र, केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तिन्ही लष्करप्रमुखांनी योजना मागे घेणार नसल्याचे रविवारी (ता. १९) स्पष्ट केले. दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेसवर (Congress) तरुणांना फूस लावल्याचा आरोप केला आहे. (Congress invites youth to violence; Allegation of Union Minister Ramdas Athawale)

खासगी कार्यक्रमासाठी अमरावतीत आले असता आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशातील तरुणांचे हित लक्षात घेऊनच अग्निपथ ही लष्कर भरतीची नवीन योजना तयार केली आहे. मात्र, या योजनेबाबत उलटसुलट प्रचार करून काँग्रेसच्या मंडळींकडून हिंसा (violence) करण्यासाठी फूस लावली जात आहे, असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

Congress invites youth to violence; Allegation of Union Minister Ramdas Athawale
एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजपमध्ये माझे दोनच नव्हे तर अनेक समर्थक; मात्र...

तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गाने आपली बाजू मांडली पाहिजे. सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार आहे. योजनेत काही बदल करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे. देशात सुरू असलेल्या हिंसाचारामागे काँग्रेस (Congress) व विरोधी पक्षांची फूस असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला.

आरपीआयला सन्मानजनक जागा देण्याबाबत चर्चा

आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीमध्ये आरपीआयला सन्मानजनक जागा देण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यादृष्टीने पुढील निवडणुका लढविल्या जातील. अमरावती विभागात मागील तीन वर्षांत शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबतची चौकशी केली जाईल, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com