काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आजपासून

Congress
Congress

नागपूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला गुरुवारी सकाळी १० वाजतापासून दीक्षाभूमी येथून प्रारंभ होत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह यात्रेत राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव  ठाकरे, विलासराव मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक सहभागी होणार आहेत. 

भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने संघर्ष यात्रेला प्रारंभ केला आहे. यात्रेचा हा पाचवा टप्पा आहे. 

दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर मोठा ताजबाग आणि गणेश टेकडी येथील मंदिराचे दर्शन घेऊन संविधान चौकातून जनसंघर्ष यात्रेचा पुढील प्रवास सुरू होईल. रामटेक येथे पहिली सभा होईल, त्यानंतर तुमसर आणि तिरोडा येथे जाहीर सभा होतील. 

केंद्रातील आणि राज्यातील नाकर्त्या भाजप-शिवसेना सरकारविरोधात जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विकास ठाकरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com