Maharashtra vidhansabha 2019 : कॉंग्रेसचे आता "जय विदर्भ'

file photo
file photo

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर कॉंग्रेस नेहमीच बॅकफुटवर असते. मात्र, रविवारी (ता. 22) ऍड. श्रीहरी अणे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी विदर्भाच्या मुद्यावर समर्थन देत निवडणुकांमध्ये विदर्भाचा प्रश्‍नावर एकत्र येण्याचा नारा बुलंद करण्याचे आवाहन केले. यानंतर कार्यकर्त्यांच्या घोषणेने देवडिया भवनात "जय विदर्भ'चा आवाज दुमदुमला.
वेगळ्या विदर्भासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन केले होते. त्यावेळी वेगळ्या विदर्भाचे नेते जांबुवंतराव यांनाच कॉंग्रेसमध्ये सामील करून घेत इंदिरा गांधी यांनी आंदोलन संपविले. त्यानंतर वेगळ्या विदर्भासाठी प्रभावी असे आंदोलन झाल्याचे दिसून आले नाही. याचे कारण दिल्लीत सत्तेत असलेला कॉंग्रेस पक्षच अनुकूल नसणे होते. मात्र, भाजपने वेगळ्या विदर्भामुळे होणारे फायदे आणि त्यामुळे येथील जनतेला होणाऱ्या विकासाचे स्वप्न दाखवित मते आपल्या बाजूने वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विदर्भात कधी नव्हे ते अभूतपूर्व यश मिळाले. त्याच जोरावर भाजपने 122 जागांचा टप्पा गाठला. आताही भाजपची पकड विदर्भात मजबूत असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांचे वेगळ्या विदर्भाच्या आश्‍वासनाकडे झालेले दुर्लक्ष आणि अद्यापही येथील मागासलेपणा कायम असल्याची परिस्थिती हाच मुद्दा करून विदर्भात कॉंग्रेसला जुने दिवस आणून देईल, असे ऍड. श्रीहरी अणे यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com