Vidhan Sabha 2019 सरकारच्या धोरणामुळे राज्यात असंतोष : मुकुल वासनिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आर्णी (जि. यवतमाळ) : "केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. परंतु, मागील पाच वर्षांत एकही काम झालेले नसून, उलट देशात मंदी आली. लाखो लोकांचे हातचे रोजगार गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. अनेक नेत्यांना ईडीचा धाक दाखवून राजकीय सूड उगवला जात आहे. अशा हुकूमशाही पक्षाला जागा दाखवा', असे आवाहन अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांनी केले.

आर्णी येथील माहेर मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्या प्रचारार्थ सभा झाली, त्याप्रसंगी वासनिक बोलत होते. यावेळी मंचावर कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विजय अंबुरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वसाहत मिर्झा, जीवन पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, स्वाती येंडे, शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिज बेग यांनी केले. छोटू देशमुख यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader mukul wasnik criticised maharashtra government