अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का लावल्यास रस्त्यावर उतरू: नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारने देशातील 10 सरकारी यंत्रणांना कुणाच्याही मोबाईल , टेलिफोन ,किंवा कॉम्पुटरशी तपासणी करणायचा अधिकार दिला असून सर्व सामान्य लोकांना त्याच्या अभिव्यती स्वातंत्र्या पासून मुकावे लागणार आहे.

गोंदिया : संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला असून मोदी सरकार हे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याने लोक याला कदापी खपवून घेणार नाहीत. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारने देशातील 10 सरकारी यंत्रणांना कुणाच्याही मोबाईल , टेलिफोन ,किंवा कॉम्पुटरशी तपासणी करणायचा अधिकार दिला असून सर्व सामान्य लोकांना त्याच्या अभिव्यती स्वातंत्र्या पासून मुकावे लागणार आहे. विरोधी पक्षाने याचा राज्यसभेत विरोध केला असून जर लवकरच हा निर्णय मागे घेतला नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून निदर्शने करेल असा इशारा नाना पाटोले यांनी दिला आहे.

पटोले म्हणाले, की फडणवीस आणि मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पाऊसाने अनेक शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर शेतऱ्यांनी धान्य विक्री करिता नेले. काही ठिकणी बारदाने उपलब्ध नसल्याने तर काही ठिकाणी धान्य मोजले गेले नसल्याने अनेक शेतकऱ्याचे धान्य उघड्यावर भिजले असून धान्य खरेदी न केळ्याने शासनाने शेतकऱ्यांचा धान्य हमी भावानुसार खरेदी करावा. यासाठी 27 डिसेंबरला पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या विधानसभा क्षेत्रातील उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येईल.

Web Title: Congress leader Nana Patole warned BJP government