काँग्रेस नेते रणजीत देशमुखांची मुलाविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

रणजीत देशमुख यांनी आपल्या घरी अमोल देशमुख हा सुखांने राहू देत नसल्याची तक्रारीत म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून आजारी असेलेले रणजीत देशमुख यांच्या सिव्हील लाईन भागातील घरीच डाॅ. अमोल देशमुख राहतात.

नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांनी त्यांचा मुलगा अमोल देशमुख त्रास होत असल्याची तक्रार बर्डी पोलिसात केली आहे.

रणजीत देशमुख यांनी आपल्या घरी अमोल देशमुख हा सुखांने राहू देत नसल्याची तक्रारीत म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून आजारी असेलेले रणजीत देशमुख यांच्या सिव्हील लाईन भागातील घरीच डाॅ. अमोल देशमुख राहतात. याच घरातील तिसऱ्या मजल्यावर अमोल देशमुख राहतात. मात्र, आपल्याच घरी आपल्या मुलामुळे त्रास होत असल्याच रणजीत देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Congress leader Ranjit Deshmukh case filed against son