Vidhan Sabha 2019 : यशोमती ठाकूर यांनी तिवसामधून भरला अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक, वाढती महागाई, बेरोजगारी हे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अमरावती : काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी आज (गुरुवार) तिवसा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज सकाळी ठाकूर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समधीचे दर्शन घेतले व त्यांनर ढोल ताशे व बाईक रॅली काढून आपले नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते.

राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक, वाढती महागाई, बेरोजगारी हे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Yashomati Thakur flies nomination form in Amravati