काँग्रेस आमदार म्हणतात, 'घरात घुसून हाणू' (व्हिडिओ)

काँग्रेस आमदार म्हणतात, 'घरात घुसून हाणू' (व्हिडिओ)

नागपूर : सध्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर नेते पक्ष बदलत आहेत. अर्थात पक्ष बदलण्याचा ओघ हा, सत्ताधारी शिवसेना आणि भाजपकडेच जास्त आहे. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. या दोन पक्षांमध्येहा पक्ष सोडण्याचा लोंढा कसा रोखायचा या विषयी चर्चादेखील सुरू आहे. या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचीही मोठी फळी भाजपकडे आकर्षित होताना दिसत आहे. अशा कार्यकर्त्यांना विदर्भात एका काँग्रेस आमदाराने धमकीच दिली आहे. 

सावनेर मतदार संघाचे आमदार सुनील केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील केदार यांच्या या व्हिडीओमुळे विदर्भात राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे. सावनेर तालुक्यातत सिल्लेवाडापर्यंत सुरू करण्यात आलेल्या ‘आपली बस सेवा’ याचे उद् घाटन आमदार केदार यांच्या हस्ते झाले. हा उद्‌घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी जिल्ह्यात चांगलाच चर्चेत आला. उद्‌घाटन कार्यक्रमातून सिल्लेवाड्याच्या सरपंचाला डावलण्यात आल्याने सावनेरचे आमदार सुनील केदार कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यांनी सरपंचाला कार्यक्रमात का बोलाविले नाही?, याचा जाब विचारला.

आपली बस सेवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार उपस्थित होते. येथे आमदार सुनील केदार पोहचल्याने कॉंग्रेस व भाजप कार्यकर्ता आमने-सामने आले. चांगलाच वाद रंगला. आयोजकांनी सिल्लेवाडाच्या सरपंच बागडे यांना डावलण्यात आल्याच्या कारणावरून काही गावकरी व कॉंग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले व गावातील महिला सरपंचाचा अपमान का केला ? असा जाब आयोजकांना विचारत भाजपचा उद्घाटनाचा कार्यक्रम उधळून लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com