बुलडाण्यावरून अडले ‘स्वाभिमानी’चे घोडे

Raju-Shetty
Raju-Shetty

अकोला - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर्त चर्चा थांबविली आहे. जागावाटपात किमान तीन ते चार जागा सन्मानजनक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त होत आहे. सध्या बुलडाण्याच्या जागेवरून आघाडीतील सहभागाचे घोडे अडल्याचे समजते. 

‘स्वाभिमानी’ला केवळ हातकणंगलेचीच जागा मिळत असेल तर किमान दहा लोकसभा मतदारसंघांत स्वतंत्रपणे लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुलडाणा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली आहे. येथून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीबाबत शेट्‌टी आग्रही आहेत.

वर्ध्यात सुबोध मोहिते यांना रिंगणात उतरविण्याची तयारी आहे. मात्र, काँग्रेसकडून वर्धा लोकसभा मतदार संघ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलडाणा लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडला जाण्याची शक्‍यता कमीच दिसते. ही सर्व स्थिती पाहता ‘स्वाभिमानी’ने आघाडीसंदर्भातील चर्चा थांबविली आहे.

आघाडीची चर्चा आम्ही थांबविली आहे. शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमी भाव अन्‌ संपूर्ण कर्जमुक्ती या विषयांचा जाहीरनाम्यात समावेश करण्याची मागणी मान्य होत असेल आणि  सन्मानजनक जागा देण्याची तयारी असेल, तरच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होऊ. जागांच्या संख्येबाबत तडजोड शक्‍य आहे; पण हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती यावर तडजोड नाही. 
- रविकांत तुपकर, प्रदेश अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com