कॉंग्रेसची संघर्ष यात्रा नऊ जानेवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
शेजारच्या तीन राज्यांमधील विजयमामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तब्बल पंधरा वर्षांची भाजपची राजवट कॉंग्रेसने उलथावली. लोकसभे पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने संघर्ष यात्रा कॉंग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या सुरुवातीला आठ जानेवारी रोजी दीक्षाभूमी, ताजबाग, टेकडी गणेशाचे दर्शन घेऊन यात्रा प्रारंभ होताच ग्रामीणमध्ये प्रवेश करेल. लोकसभेतील पक्षनेते व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीसद्वय मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विलास मुत्तेमवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे अन्य नेते सहभागी होणार आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा मार्गे नागपुरात ...... जानेवारीला यात्रा पोहोचेल आणि ....... तारखेला जाहीर सभा होईल.
बैठकीस सुरेश भोयर, एस.क्‍यू. झमा, मुजीब पठाण, संजय मेश्राम, कुंदा राऊत, तक्षशीला वाघधरे, रमेश जोध, किरण नागरीकर, नाना कंभाले, शहाजहा शफाअत, शकुर नागाणी, तुळशीराम काळमेघ, सतीश चव्हाण, प्रकाश वसू, इस्राईल शेख, सुदर्शन नवघरे, हर्षवर्धन निकोसे, काशिनाथ प्रधान, अरुण हटवार, खेमसिंग जाधव, कृष्णा यादव, नंदा तिजारे, जयमाला शेंडे, वसंत गाडगे, राहुल सिरीया, मतीन खान, दामोदर धोपटे, मधुकर बारोकर उपस्थित होते.
"कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, कामाला लागा'
यात्रेची नागपूर जिल्ह्यातून होणार असल्याने आपल्या क्षेत्रात यात्रा यावी, यासाठी ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी बैठकीत आग्रही भूमिका घेतली. सर्व विधानसभा मतदारसंघात यात्रा पोहोचावी, यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. त्याची तयारी बुथ पातळीवरून करण्यात यावी. तीन राज्यातील निकाल आणि जनतेच्या भावना लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या उत्साहातून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राजेंद्र मुळक यांनी केले.

Web Title: congress party news