विदर्भात काँग्रेसकडून भाजपचा गड उद्ध्वस्त; 27 वर्षांनी काँग्रेसची सत्ता

विदर्भात काँग्रेसकडून भाजपचा गड उद्ध्वस्त; 27 वर्षांनी काँग्रेसची सत्ता

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण नगर परिषद घेऊन वर्चस्व सिद्ध केले. 

या नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेला हा चंद्रपूर जिल्ह्यातील भाग आहे. त्यामुळे या नगरपरिषदेवर सातत्याने भाजपचा ताबा राहिला होता. ब्रम्हपुरीमध्ये तब्बल 27 वर्षांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. रिता उराडे यांनी भाजपच्या यास्मिन लखानी यांचा पराभव केला.

ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या 20 सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे 12 नगरसेवकही निवडून आले आहेत. भाजपचे 3 नगरसेवक निवडून आले तर इतरांनी 5 जागा पटकाविल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार एकमेव आमदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वर्चस्वालाही एकप्रकारे धक्का बसल्याचे बोलले जात आहे. 

या विजयाबद्दल बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, ''गेल्या 27 वर्षांपासून भाजपची या नगरपरिषदेवर सत्ता आहे. परंतु या शहराचा विकास झाला नाही या उलट अधिक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. ब्रम्हपुरीच्या मतदारांनी काँग्रेसच्या धोरणावर विश्‍वास टाकला व यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी भूमिका आहे. या विजयाने पूर्व विदर्भातील जनमानस स्पष्ट झाले असून राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com