अश्विनीकुमार चौबेंच्या पुतळ्याला काँग्रेसने मारले जोडे; राम कदमांनाही दिला इशारा 

Congress Protest to comment on Ashwini Kumar Choubey at shegaon buldhana
Congress Protest to comment on Ashwini Kumar Choubey at shegaon buldhana

शेगाव जि. बुलडाणा : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अनंत आकाशासारखे आहेत. याउलट राहुल यांचा आकार नालीतील एखाद्या किड्यासारखा आहे. तर 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी नुकतेच दहीहंडीच्या कार्यक्रम मध्ये बोलले त्यांच्या या वक्तव्याचा राज्यभर काँग्रेस कडून निषेध करण्यात येत आहे. यामध्ये आज बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात चौबे यांच्या पुतळ्याला जोडेमारो तर कदमांच्या वक्तव्यांचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी 13 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भाजप खासदार अश्विनीकुमार चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून आज बुधवारी शेगाव शहरात काँग्रेस च्या सोशल मीडिया सेल कडून पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर  मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी नुकतेच दहीहंडी च्या कार्यक्रम मध्ये बोलले त्यांच्या या वक्तव्याचा आज बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात चौबे यांच्या पुतळ्याला जोडेमारो तर कदमांच्या वक्तव्यांचा निषेध आंदोलन करण्यात आले.

स्थानिक शिवाजी चौकात हे आंदोलन पार पडले यावेळी पोलिसांनी जाळण्यासाठी आणलेला पुतळा वेळीच जप्त करून 13 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात सोशल मीडिया सेल चे कार्याध्यक्ष अमित जाधव यांच्यासह काँग्रेस चे नेते प्रसन्नजीत पाटील , ज्ञानेश्वरदादा पाटील जिल्हा उपाध्यक्ष कैलास देशमुख सह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com