उत्तर नागपुरात कॉंग्रेसचे बंडाचे निशान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : नितीन राऊत यांना उमेदवारी दिल्याने उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून उद्या, मंगळवारी ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवकांसह कॉंग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे महिनाभरापासून राऊत यांना उमेदवारी देऊ नका याकरिता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदने दिली होती. 

शहर कॉंग्रेसची कार्यकारिणी त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत राऊत यांनी पक्षविरोधी काम केल्याचा येथील पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. तेव्हापासूनच त्यांचे येथील पदाधिकऱ्यांचे बिनसले होते. लोकसभेतही राऊत यांनी कुठलीच ठोस सक्रिय भूमिका घेतली नव्हती. प्रदेश कार्याध्यक्ष केल्यानंतरही राऊत यांनी देवडिया कॉंग्रेस भवनला भेट दिली नाही. पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांना उपस्थिती लावली नाही. देवडिया कॉंग्रेस भवन येथे पक्षातर्फे घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींना कार्याध्यक्ष या नात्यानेही ते उपस्थित राहिले नाही. त्यामुळे मुलाखत देणाऱ्या सर्व इच्छुकांनी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, राऊत यांना देऊ नये अशी मागणी केली जात होती. सर्वांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांनी नागपूर तर दिल्ली येथे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांची भेटी घेऊन निवेदन दिले होते. दिल्ली भेटीत राऊत यांनी उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू असाही इशारा देण्यात आला होता. यानंतरी कॉंग्रेसच्या पहिल्याच यादीत नितीन राऊत यांचा समावेश केल्याने कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये तीन ब्लॉक अध्यक्ष, चार नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. बंडखोरांचे नेतृत्व नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, त्रिशरण सहारे आदी करीत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress rebellion, North Nagpur