काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या चर्चेचे भिजत घोंगडे असल्याने आघाडीतील पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने मंगळवार, 10 डिसेंबर तर शिवसेनेने शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आखला आहे

अकोला : राज्यातील सत्ता समिकरणानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या चर्चेचे भिजत घोंगडे असल्याने आघाडीतील पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने मंगळवार, 10 डिसेंबर तर शिवसेनेने शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आखला आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती स्वराज भवन अकोला येथे निवड समितीचे सदस्य घेणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जिल्हा निवड समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल पदसिद्ध अध्यक्ष आहेत. इतर सदस्यांमध्ये पक्षाचे माजी मंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार, पक्षाचे विधानसभेचे उमेदवार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, महिला काँग्रेस, सेवादल, इंटक, अनुसूचित जाती-जमाती सेल, मागासवर्गीय सेल, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते इत्यादींचा समावेश आहे.

Image may contain: text and outdoor

काँग्रेसच्या मुलाखती अशा होतील
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीच्या कार्यक्रमानुसार मंगळवारी दुपारी 12 वाजता तेल्हारा, दुपारी 1 वाजता अकोट तालुका, दुपारी 2 वाजता पातूर तालुका, दुपारी 3 वाजता बाळापूर तालुका, सायंकाळी 4 वाजता बार्शीटाकळी तालुका, सायंकाळी 5 वाजता मूर्तिजापूर तालुका, सायंकाळी 6 वाजता अकोला तालुक्याच्या मुलाखती होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांनी दिली.

हेही वाचा - तुम्ही जादूटोणा मानता काय? 

शिवसेनेच्या मुलाखती जिल्हा कार्यालयात
शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार, ता. 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पासून जिल्हा कार्यालया आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती माजी केद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांनी नियुक्त केलेली समिती घेणार आहे. या समितीती संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्यासह जिल्हा प्रमुख, आमदार, सह संपर्क प्रमुख, महिला पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress, Shivsena ready for self-election