चंद्रपूर, मूल येथे कॉंग्रेसचा विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या दोन प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप किरमे आणि कॉंग्रेसच्या कलामती यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. या दोन्ही प्रभागांत बसपचे नगरसेवक होते. मात्र, या जागा राखण्यात बसपला अपयश आले. तर, मूल येथे कॉंग्रेसच्या ललिता फुलझेले विजयी झाल्या आहेत.इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभाग क्रमांक 6 "ब' महिलांकरिता राखीव आहे. या प्रभागात कॉंग्रेसतर्फे कलामती रामकृपाल यादव, भारतीय जनता पक्षातर्फे रंजना रवींद्र उमाठे, बहुजन समाज पक्षातर्फे सुनीता सुभाष दोनोडे रिंगणात होते.

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या दोन प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप किरमे आणि कॉंग्रेसच्या कलामती यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. या दोन्ही प्रभागांत बसपचे नगरसेवक होते. मात्र, या जागा राखण्यात बसपला अपयश आले. तर, मूल येथे कॉंग्रेसच्या ललिता फुलझेले विजयी झाल्या आहेत.इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभाग क्रमांक 6 "ब' महिलांकरिता राखीव आहे. या प्रभागात कॉंग्रेसतर्फे कलामती रामकृपाल यादव, भारतीय जनता पक्षातर्फे रंजना रवींद्र उमाठे, बहुजन समाज पक्षातर्फे सुनीता सुभाष दोनोडे रिंगणात होते. यात कलामती यादव यांना दोन हजार 522, सुनीता दोनोडे यांना एक हजार 266, तर रंजना उमाठे यांना एक हजार 265 मते प्राप्त झाली. 58 मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला. बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 "ब' मध्ये भाजपतर्फे प्रदीप गणपत किरमे, बहुजन समाज पक्षातर्फे भास्कर भाऊराव गहुकर, तर अपक्ष म्हणून राजू शंकरराव कृष्णापूरकर, संजय आनंदराव बुरडकर व प्रवीण शंकर खनके निवडणूक लढत होते. संजय बुरडकर हे कॉंग्रेस समर्थित उमेदवार होते. किरमे यांना एक हजार 704, बुरडकर यांना एक हजार 583, प्रवीण खनके यांना एक हजार 376, भास्कर गहूकर यांना 948, तर राजू कृष्णापूरकर यांना 775 मते प्राप्त झालीत. 83 नोटा मते होती.
मूल येथे कॉंग्रेसच्या ललिता फुलझेले विजयी
येथील प्रभाग क्रमांक सहा "अ' मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या ललिता फुलझेले विजयी झाल्या आहेत. फुलझेले यांना 704 मते प्राप्त झाली. भाजपच्या शिल्पा रामटेके यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यांना 531 मते प्राप्त झाली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील कॉंग्रेसचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress victory at Chandrapur, Mul