बघतो पाहतोमुळे सोडचिठ्ठी, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

भुपेश बारंगे
सोमवार, 16 जुलै 2018

कारंजा : काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सध्या नाराजीचा सुर काढत असल्याने आपले नेते बघतो आणि पाहतो हेच दोन वाक्य त्याच्या श्रीमुखात असल्याने त्यापुढे काहीच काम करत नसल्याने काहींनी पक्षतूनच काढता पाय घेतलेला दिसत आहे.

कारंजा : काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सध्या नाराजीचा सुर काढत असल्याने आपले नेते बघतो आणि पाहतो हेच दोन वाक्य त्याच्या श्रीमुखात असल्याने त्यापुढे काहीच काम करत नसल्याने काहींनी पक्षतूनच काढता पाय घेतलेला दिसत आहे.

जिल्ह्यात असो की आर्वी मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. कालांतराने काँग्रेस गळती होत एकदा पराभूत पत्करावा लागला. पुन्हा दम भरून काही मतांनी निवडून आले तेही कार्यकर्ते पकड असल्याने. चला असो आपल्या नेत्यांचा विजय झाला अस बोलून आपल्या कामाला लागले. आपली पोळी भाजून आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्यांना मात्र दगा दिला जात असल्याने त्याचे डोळे कालांतराने उघडायला सुरुवात झाली.

मागील महिन्यात कारंजा नगर पंचायतीची अडीच वर्षे पूर्ण झाल्याने पुन्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड लागली यात नवनिर्वाचित नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पद आपल्याला दिला जाणार असल्याने त्याचे स्वप्न होते. मात्र काही वेळात ते स्वप्न भंगल्याने माळी पुरा वॉर्डातील काँग्रेस नगरसेवक संजय कदम यांच्या पायाखाली रेती सरकली. त्यामुळे आपल्याला पद मिळाले नसल्याने नाराज असलेले नगरसेवक हे आज चक्क भाजप खासदार यांच्या हातात पुष्पगुच्छ देताना छायाचित्रात दिसले. त्यांच्या सोबत माजी पंचायत समिती सदस्य तेजराव बन्नगरे यांना कारंजा पंचायत समिती वर सत्ता बसविताना सभापती पदापासून डावलल्यामुळे त्यांची नाराजी दिसत होती.

माजी तालुका काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राजेश काळबांडे सोबत होते.जेष्ठ नेते मेघराज चौधरी यांच्या खेम्यात असलेले काँग्रेस माजीअध्यक्ष भाजपच्या वाटेवर दिसत आहे. यामुळे हे भाजपवासी होणार असल्याने संकेत यावरून दिसत आहे ,आपल्या नेत्याकडे काही प्रकरण घेऊन गेलो की त्यांच्या श्रीमुखात दोनच शब्द पडतात ते फक्त बघतो आणि पाहतो अस बोलूल आपल्या जवळील कागदपत्र असो की काही काम असो काम करावे लागते त्यावेळी बघतो पाहतो करून आपल्याला टरकून देतात मग काय ते कामही केल्या जात नाही त्यामुळे आमच्या पाठीमागचे कार्यकर्ते आमच्या नाराज होते त्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतला की येथे राहण्यापेक्षा दुसरीकडे जाऊन आपले तर काम होईल असे नाव न सांगण्याच्या अटीवरुन  सांगितले.

एकीकडे काँग्रेस भाजपला पराभूत करण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे, मात्र दुसरी कडे काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी एक एक कमी होताना दिसत असल्याने नेमकं चाललं तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून कोणाला काय शिकावं ते शिकावं पण येणार काळ सांगेल कोण कुठे आहे त्याचा तो वयक्तिक भाग आहे या परिसरात मात्र काँग्रेसला गळती सुरू झाल्याचे दिसत आहे.

भाजपमध्ये दोन गट दिसत असल्याने यात माजी सदस्य कोणाकडून पक्षात प्रवेश घेतात याकडे भाजपातील गोट्यात चर्चेला उधाण आलं आहे. ग्रामीण भागातील राजकारण करायचे किंवा कारंजा शहराचे राजकारण करायचे यावर भाजपातील पदाधिकाऱ्यांची नजर आहे त्याकडे लक्ष ठेऊन त्यांना भाजपात प्रवेश घ्यावा लागेल हे विशेष.

Web Title: congress workers are angry