सातत्य व परिश्रमानेच यशप्राप्ती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

अमरावती - सलग तिसऱ्याही वर्षी अमरावती विभागीय संघाने 504 गुणांसह शिवाजी ऑलिम्पियाड ट्रॉफी जिंकून हॅट्ट्रिक साधली. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित शिवाजी ऑलिम्पियाडचा समारोप शुक्रवारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सातत्य व परिश्रमातूनच यशाची प्राप्ती होते, असे उद्‌गार या वेळी कविता राऊत यांनी काढले. 

शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत व कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समारोप झाला. व्यासपीठावर विजयेंद्रसिंग, महेश तुंगार, सचिव वि. गो. भांबूरकर, रवी मेटकर, प्रा. अरुण सांगोळे, अरविंद मंगळे, प्राचार्य संजय शेंडे, नंदकिशोर चिखले, डॉ. सतीश पहाडे आदी होते. 

खेळाडूंना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी मेहनत व स्मार्ट वर्क या दोन बाबी कटाक्षाने पाळाव्यात. यश निश्‍चितच प्राप्त होते. आपला खेळाडू हा अधिक सक्षम घडला पाहिजे. तो अधिक हेल्दी व स्मार्ट असला पाहिजे. खेळात त्याने आपले कौशल्य वापरून अधिक कसदार कसे बनणार, याचे भान ठेवावे, असे आवाहन कविता राऊत यांनी केले. 

शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात तीन दिवस चाललेल्या या ऑलिम्पियाडमध्ये तीन हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. यात नागपूर, अकोला, दर्यापूर, वरुड, मोर्शी, अमरावती संघांचा समावेश होता. अमरावती संघ सर्वाधिक गुणांसह विजयी झाला. तर, वरुडला उपविजेतेपद मिळाले. या वेळी संयोजन समितीचे डॉ. डी. आर. डबीर, डॉ. उल्हास देशमुख, डॉ. पुष्पलता देशमुख, डॉ. सायर, डॉ. ठोसर, प्रा. राजेंद्र डोंगरे, डॉ. सुभाष गावंडे, डॉ. हनुमंत लुंगे, प्रा. विलास ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Consistent efforts and high attainment

टॅग्स