गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ  - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले. 

नागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे आयोजित 62 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त ते दीक्षाभूमीवर बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आमचे सरकार फक्त संविधानाने चालेल. संविधानाच्या मूल्यांवर चालेल. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समतेच्या मार्गाने चालेल. राज्यातील 32 हजार शाळांमध्ये फक्त संविधानाचे वाचनच होत नाही, तर या शाळेतील विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य शिकविले जात आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना पावलोपावली बाबासाहेबानी दिलेले संविधान मार्गदर्शक ठरत आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळते, पद मिळते, आम्ही मुख्यमंत्री होतो, त्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळत नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी 3 हजार कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली. तिथेही काम सुरू झाले असून, डिसेंबर 2020 पर्यंत स्मारक पूर्ण करू. 

Web Title: Constitution best says Chief Minister