सिमेंट रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नागपूर - नागपूर-बोरी-तुळजापूर या यवतमाळ जिल्ह्यातील सिमेंट रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. दिगंबर पचगाडे यांनी ही याचिका दाखल केली असून कामाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. 

यवतमाळ जिल्हयातील नागपूर-बोरी-तुळजापूर सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाची चौकशी व्हावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. सुमित बाजोरिया यांना रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर तसेच बसस्टॅण्ड ते वनवासी मारुती मंदिर या रस्त्यांचे बांधकाम त्यांनी केले आहे. रस्त्याचे बांधकाम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले अभियंते कामाची पाहणी करण्यासाठी नियुक्त करायला हवे होते. कंत्राटदाराने कोणत्याही अटींचे पालन केलेले नाही. दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या एका अभियंत्याने तक्रारही केली होती. परंतु, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांनी तक्रारकर्ता अभियंत्याची बदली केली. त्यामुळे याचिकाकर्त्याने माहितीच्या अधिकारात वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला व उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. शशीभूषण वाहणे यांनी बाजू मांडली. या प्रकरणार न्यायालयाने सार्वजिन बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, संबंधित सक्षम अधिकारी, यवतमाळ पोलिस अधीक्षक व सुमित बाजोरिया यांना प्रतिवादी केले आहे. या प्रकरणावर उन्हाळी सुट्यांच्या अवकाशानंतर 7 जूनला सुनावणी होणार आहे. 

Web Title: Construction of Cement Road is of degraded quality