छायाचित्र
छायाचित्र

छोट्या मावळ्यांची किल्ले उभारणी सुरू

नागपूर ः दिवाळीची आतुरता ही लहान-मोठ्या सगळ्यांनाच लागलेली असते. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने घराघरांत गृहिणी साफसफाई, फराळ बनवण्याच्या घाईगडबडीत आहेत. तर, छोटे मावळे मात्र यंदा एखादा नवीन किल्ला "सर' करण्यासाठी, किल्ला बनवायचा कोठे, त्याचे सामान कोठून आणायचे, मावळे कसे गोळा करायचे, याबाबत व्यूहरचना आखण्यात गुंग झाले आहेत.

सध्याचे युग हे संगणकाचे असले तरी नागपूर शहरात विविध भागांत काही मराठमोळ्या ठिकाणी लहान मुले आजही मातीपासून किल्ले बनवतात. किल्ले बनविणे हे जरी पारंपरिक असले तरी लहान मुलांकडून त्यामध्येही वेगवेगळ्या क्‍लुप्त्या लढवत त्याला आधुनिक आणि अधिक आकर्षक रूप देण्याचा प्रयत्न लहान मुलांकडून सुरू आहे. काही मुलांनी इंटरनेटवरून रायगड, प्रतापगड, शिवनेरी अशा अनेक किल्ल्यांचे छायाचित्र काढून त्याप्रमाणे किल्ला उभारण्यास सुरुवात केली आहे. किल्ल्यांच्या आजूबाजूला हिरवळ दाखवण्यासाठी मुलांनी किल्ले बनवण्याच्या जागेवर मोहरी पेरली आहे. आम्ही दगड, मातीने किल्ले बनवतोय. किल्ल्यासाठी लागणारे तोफा, हत्ती, घोडे, मावळे, शिवाजी महाराज हे आम्ही विकत आणतो. सध्या बाजारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवलेले किल्लेही उपलब्ध आहेत. ते विकत आणून सजवले जातात. परंतु, अनेकजण मातीचा वापर करूनच किल्ले तयार करत असतात. छोट्यांचा उत्साह पाहून विविध संस्था संघटनांनी विविध ठिकाणी किल्ले स्पर्धांचे आयोजन केले आहे.

शिवकालीन व काल्पनिक किल्ले
युवक लॉन्सर्स क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमीत्त शिवकालीन व काल्पनिक किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा असले त्यांनी 26 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करायचे आहे. किल्ले स्पर्धेचे परीक्षण बुधवारी (ता. 30) केले जाईल. यासाठी सर्व स्पर्धकांनी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी सुरेश कदम, 797, आशीर्वादनगर, नागपूर, श्‍याम साठे, अलोणे बिल्डिंगमागे, गणेशपेठ आणि मंगेश बारसागडे, खानखोजीनगर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उल्हासनगरात विनामूल्य किल्ले स्पर्धा
विदर्भ अवॉर्ड विनर्स वेलफेअर असोसिएशनद्वारे दिवाळीमध्ये विनामूल्य किल्ले स्पर्धा घेण्यात येत आहे. नाव नोंदणी 30 ऑक्‍टोबरपर्यंत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुलांनी स्वतः किल्ले बनवावे, घरातील निरुपयोगी वस्तूंचा उपयोग करून, आपल्या कल्पनांना वाव देऊन कलाकृती तयार करायची आहे. याकरिता घरातील सदस्यांची मदत घेता येईल. मित्रमंडळ असल्यास पाच मुलांचा ग्रुप तयार करावा. किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण 5 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अधीर बागडे, पंढरीनाथ सालीगुजेवार, संयोजक सुरेश रेवतकर आदींनी केले आहे.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com