मोन्सॅन्टो'ला ग्राहक न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

यवतमाळ : कपाशीच्या सदोष बियाण्यामुळे जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ही बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे संबंधित बियाण्यांच्या "मोन्सॅन्टो' कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 15 लाख 34 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. आर्णी व केळापूर तालुक्‍यातील 11 शेतकऱ्यांनी याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवर न्यायालयाने हा निकाल दिला.

आर्णी तालुक्‍यातील डोमा राठोड, विजय कोरपकवार, सुरेशचंद्र अटल, संजय राठोड, माणिक पवार, रामहरी गोनेवार या सहा शेतकऱ्यांनी 2011-12मध्ये; तर, केळापूर तालुक्‍यातील रमाकांता देशट्टीवार, विलास देशट्टीवार, दीपक राठोड, उत्तम चव्हाण, गणेश जाधव या पाच शेतकऱ्यांनी 2015 मध्ये सन कृषी केंद्रातून "मोन्सॅन्टो' कंपनीच्या कपाशी बियाण्यांची खरेदी केली व त्याची पेरणी केली होती. मात्र, बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या वेगवेगळ्या तपासणी अहवालांत बियाणे उगवले नाही, असे स्पष्ट नमूद केले.
या अहवालानंतर शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. कंपनीने टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने दोन्ही बाजूंची तपासणी केली. बियाणे सदोष असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नुकसानापोटी सुरेशचंद्र अटल यांना 2 लाख 96 हजार, माणिक पवार 32 हजार, डोमा राठोड, विजय कोरपकवार, संजय राठोड, रामहरी गोनेवार यांना प्रत्येकी 24 हजार, केळापूर तालुक्‍यातील रमाकांता देशट्टीवार यांना 5 लाख 20 हजार, विलास देशट्टीवार 90 हजार, दीपक राठोड 36 हजार, उत्तम चव्हाण 68 हजार आणि गणेश जाधव यांना तीन लाख 96 हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य ऍड. आश्‍लेषा दिघाडे, सुहास आळशी यांनी नुकताच दिला आहे.

Web Title: consumer court news

टॅग्स