...असा पेटला भर‌ रस्त्यात चालता कंटनेर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

चालत्या कंटेनर वाहनाने भररस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्गवरील बोरगाव नजीक घडली. सुदैवाने या आगीच्या घटनेवेळी गाडीतील वाहन चालक प्रसंगावधान राखून बाहेर पडले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
 

बोरगाव मंजू (अकोला) : चालत्या कंटेनर वाहनाने भररस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्गवरील बोरगाव नजीक घडली. सुदैवाने या आगीच्या घटनेवेळी गाडीतील वाहन चालक प्रसंगावधान राखून बाहेर पडले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राष्ट्रीय महामार्गवरील डोंगरगाव व वाशिंबा जवळ चालत्या कंटेनरने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण चालक यांनी प्रसंगावधान दाखवून हुशारीने कंटेनर महामार्गाच्या रस्त्यालगत उभा थांबवला व कंटेनरला लागलेली आग विझवन्यासाठी अग्निशमन दलाला माहिती दिली.  त्यानंतर अग्निशमन गाडी तेथे पोहोचली. आग विझवण्यात आली.

सध्या कंटेनर चालकाने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे. मात्र, आग लागल्याचं नेमकं कारण अदयाप पर्यत कळू शकले नाही. एन. एल. 01 एन 2331 असा आग लागलेल्या कंटेनरचा क्रमांक आहे.

Web Title: Container Burned in running on the street