भाजपच्या जाहीरनाम्यात न्यायालयाचा अवमान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

अकोला : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात राम मंदिर बांधण्याचा उल्लेख आहे. निवडणुकीत कोणत्याही जात किंवा धर्माचा आधार न घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हा अवमान आहे. याविरोधात आता निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच्या भाजपच्या जाहीरनाम्यात मुख्य मुद्दा हा राम मंदिर बांधण्याबाबतचा आहे. हा थेट एका जाती, धर्माच्या मतदारांना प्रभावित करणारा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे. कोणत्याही जाती, धर्माचा आधार निवडणुकीसाठी घेता येत नाही. तसे झाल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी. उत्तर प्रदेशात भाजपच्या जाहीरनाम्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचा भंग झाला असल्याचे स्पष्ट होते, असे डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आता निवडणूक आयोगाने या प्रकरणात करवाई करावी, अशीही त्यांनी केली आहे.

Web Title: contempt of court in bjp manifesto, says ambedkar