संततधार पावसाने शहर जलमय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे विदर्भात सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. नागपुरातही गुरूवार सकाळी वरुणराजा जोरदार बरसला. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्‍यता आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात गुरूवारी रेड अलर्ट दिला होता. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या मध्य भारतावर ढगांची प्रचंड दाटी आहे. शहरातील अनेक भागांत विशेषत: सकाळी दहाच्या सुमारास मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. ऐन कार्यालयात जाण्याच्या वेळेला पाऊस आल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मॉन्सून यंदा पंधरा दिवस उशिरा दाखल झाल्यानंतरही विदर्भातील बहूतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: continuously rain in nagpur