एमबीबीएसच्या रिक्त जागांसाठी कंत्राटी बीएएमएस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

यवतमाळ : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट "अ' एमबीबीएसच्या रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने बीएएमएस डॉक्‍टर नियुक्तीचा निर्णय शासनाने नुकताच घेतला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीमार्फत गुरुवारी (ता.25) जिल्ह्यातील 36 रिक्त जागांसाठी 103 बीएएमएस उमेदवारांच्या मुलाखाती घेण्यात आल्या.

शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवा देण्यात एमबीबीएस डॉक्‍टर नाखूष असल्याने ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयत्न करूनही एमबीबीएस पदवी, पदव्युत्तर डॉक्‍टर मिळत नाही. मंजूर वैद्यकीय पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हारुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी गट "अ' पदावर बीएएमएस डॉक्‍टर उमेदवारांतून भरण्यात येत आहेत. रिक्त पदांवर बीएएमएस डॉक्‍टरांची नियुक्ती 11 महिन्यांसाठी राहणार आहे. या दरम्यान त्या नियुक्त जागेवर नियमित वैद्यकीय अधिकारी किंवा बंधपत्रित एमबीबीएस अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत ही नियुक्ती राहणार आहे. जिल्ह्यातील 36 रिक्त जागांसाठी 240 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 103 उमेदवारांची गुरुवारी मुलाखत घेण्यात आली असून, लवकरच त्यांची नियुक्ती होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या व सामान्य रुग्णांना स्थानिक पातळीवरच वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contract BAMS for MBBS vacancies

फोटो गॅलरी