अकोल्यात इंग्रजीच्या पेपरला काॅपी

hsc student
hsc student

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेस मंगळवारी (ता.१८) पासून सुरूवात झाली आहे. या परीक्षेत पहिल्याच दिवशी दोन विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले आहेत.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी परीक्षा जिल्हाभरात ८३ परीक्षा केंद्रावरून घेण्यात येत आहे. याकरिता विज्ञान, कला, वाणिज्य तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेले विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले आहे.   या  परीक्षेत पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. या पेपरमध्ये दोन विद्यार्थांना रस्टीकेट करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा ज्युनिअर महाविद्यालय दहिगाव गावंडे येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून पूर्ण संवेदनशील केंद्रावर परीक्षा मंडळांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

सात भरारी पथकाचे लक्ष
बारावीची परीक्षा शांततापूर्ण वातावरण व्हावी, याकरिता परीक्षा मंडळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय विशेष प्रयत्नशील आहे. या परीक्षेकरीता कॉफीमुक्त अभियानावर भर देण्यात येत असून, परीक्षेदरम्यान सात विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या भरारी पथकांच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

पालकाना नाहक मनस्ताप
बारावीच्या परीक्षा बुधवारी शहरात सुरू झाली आहे. परंतु विद्यार्थ्यांना सोडायला जाणाऱ्या पालकांच्या वाहनांची हवा सोडण्याचा प्रकार सेंटर होत घडला. हा प्रकार निंदनीय असून, वाहने एका बाजूला उभी करीत असतांना सुद्धा गेटपर्यंत मुलींची आई जात असताना एलआरटी, ए.सो., राधा देवी गोयंका, शिवाजी कॉलेज परिसरात घडल्याच्या तक्रारी श्रीराम नवमी शोभायात्रा समितीकडे आले आहे. हा प्रकार पोलिसांनी त्वरित थांबावा बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात याव्या, विद्यार्थ्यांना सोडून जात असताना पालकांच्या गाड्यांची हवा सोडण्याचा प्रकार नंदनीय असून, या प्रकाराची शिक्षण विभागाने सुद्धा दखल घ्यावी तसेच पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा रामनवमी शोभायात्रा समिती या संदर्भात जनजागृती करेल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com