कोथींबिर 500 रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

नागपूर : शहराच्या ठोक बाजारपेठेत कोथिंबिरीला विक्रमी भाव मिळाला असून, आठवडाभरात कोथिंबीर किलोमागे दुपटीने वाढल्याने, आज घाऊक बाजारात 500 रुपये किलोने विक्री झाली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू असल्याने बाजार समितीतील आवक घटली आहे. यामुळे पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात कोथिंबिरीचा भाव 250 रुपये किलोवर गेला होता. तोच आज दुप्पट होऊन, 500 वर पोहोचला आहे. कोथिंबीर बरोबरच मेथी, पालक या पालेभाज्याही मध्यमवर्गीयांच्या ताटात दिसेनाशा झाल्या आहेत.

कोथिंबिरीची एक जुडी घ्यायची म्हटली तरी, 50 रुपये मोजून द्यावे लागत आहेत. नागपुरात उशिरानं पावसाचं आगमन झालं. त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारी भाज्यांची आवक थांबली. परिणामी नाशिक आणि इतर राज्यातील कोथिंबीर आणि इतर भाजीपाला नागपुरात येत आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीर 150 रुपये पाव दराने विकली जाते. कोथिंबीर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर झालंय. शहरातील कॉटन मार्केट येथील भाजी बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटलेली आहे. एक पाव कोथिंबीर महिन्यापूर्वी 25 ते 30 रुपयांना मिळत होती. मेथीही 150 रुपये किलोवर गेली आहे. पालकचे दर 50 रुपयांवर स्थिर आहेत. काही दिवसांपूर्वी पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलोने मिळणारी हिरवी मिरची किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपयांस मिळत आहे. कांद्याचे भावही वाढण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती छत्रपती चौकातील विक्रेते राजेश साबळे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coriander 500 kg