अमरावतीत अडकलेल्या 11 विदेशी नागरिकांचा अहवाल आला, काय आहे यात?

corona reports of eleven foreighners received
corona reports of eleven foreighners received

अमरावती : स्थानिक साबनपुरा येथील मशिदीमध्ये आश्रयार्थ असलेल्या 18 पैकी 11 विदेशी नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. चार नमुने पुनर्तपासणीकरिता तर हाथीपुरा येथील कोरोना बाधित चौघांचे नमुने दुबार तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.

प्रत्येकी पाच महिला व पुरुष म्यानमारमधून तर प्रत्येकी एक दक्षिण आफ्रिका व अमेरिकेवरून तर सहा जण टोंगलाईन्स देशातून पर्यटन विजावर भारतात आले होते. संबंधित पर्यटक 29 फेब्रुवारीला शहरात दाखल झाले होते. त्यांनी आगमनाची सूचना पोलिसांना दिली होती. 14 मार्चला त्यांची आरोग्य तपासणीसुद्धा झाली. दरम्यान कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाउन घोषित झाल्याने संबंधित पर्यटक अडकल्याने त्यांनी मशिदीत आश्रय घेतला होता.

कोरोना बाधित कुटुंबीयांचे स्वॅब पुन्हा पाठविणार

लॉकडाउनमध्ये सर्वच धार्मिकस्थळ बंद असताना विदेशी 18 पर्यटकांचे वास्तव्य मशिदीत आढळल्याने त्यांच्यावर विजा उल्लंघनाचा ठपका ठेवत 4 एप्रिलला गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित पर्यटक दिल्लीच्या मरकझ मशिदीतून आलेले असल्याने त्यांचेही थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. 18 पैकी 11 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर चौघांचे स्वॅब पुनर्तपासणीसाठी पाठविले जात असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

हाथीपुरा येथील एकाच कुटुंबात पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. 15 दिवसांपासून उपचारार्थ दाखल असलेल्या चार व्यक्तींची प्रकृती स्थिर असून त्यांचे थ्रोट स्वॅब शुक्रवारी (ता.17) अथवा शनिवारी (ता.18) पाठविले जातील. उपचाराने त्यांच्या आजारात बदल झालेला आहे किंवा नाही, हे अहवालातून स्पष्ट होईल. वलगाव येथील संस्थात्मक केंद्रात क्वारंटाइन असलेल्या 35 पैकी 29 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आलेले आहेत, उर्वरित सहा जणांच्या नमुन्यांची प्रतीक्षा केली जात आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com