CoronaVirus : फिलिपिन्समध्ये अडकले 13 विद्यार्थी; खासदारांची विदेश मंत्र्यांकडे धाव

coronavirus-4923544_960_720.jpg
coronavirus-4923544_960_720.jpg

बुलडाणा : जगभरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच परदेशात असलेल्या नोकरदार, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या देशातील मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासाठी गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील 13 विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांना व्हिसा मिळण्यासाठी अडचण होत असल्यामुळे ते अडकले आहे. याबाबत खासदार प्रतापराव जाधव यांनी विदेश मंत्रालयाला निवेदन देते त्यांना मायदेशात आणण्याची मागणी केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासाठी फिलिपिन्स येथील अमा विद्यापीठात भारतातून शिकायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचप्रकारे इतरही देशांमध्ये भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या जगभरावरील संकटामुळे वातावरण भयभीत झाले आहे. त्यातच यात्रा प्रतिबंधित आदेशामुळे या विद्यार्थांची घराकडे परतण्याची इच्छा असतानाही ती बाब सद्या अवघड झाली आहे. करोना विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारचा निर्णय योग्य असला तरी या विद्यार्थांच्या आई-वडील व नातलगांमध्ये चिंता पसरली आहे. 

ठोस योग्य निर्णय घेण्याची गरज
विद्यार्थांना स्वदेशी आणण्यासाठी योग्य ती ठोस पाऊले उचलण्यात यावीत अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ विद्यार्थी फिलिपिन्स देशात अडकलेले आहे. कोरोना विषाणू वेगाने फैलत होत असून, त्यावर उपाययोजना म्हणून 17 मार्चला यात्रा प्रतिबंधित आदेश भारत सरकारने लागू केला आहे. या आदेशान्वये परदेशातून येणाऱ्यांना रोखण्यात आले आहे. सोबतच पर्यटनही थांबविले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 13 विद्यार्थी यांच्या नातेवाइकाची मागणीनुसार स्वदेशात आणण्यासाठी ठोस योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणी भारत सरकारचे विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचा पासपोर्ट व प्रवेश रद्द होण्याची चिंता
कोरोनाच्या चिंतेमुळे हे विद्यार्थी घराकडे स्वदेशी यावेत अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. सद्या त्या राष्ट्रातील नियमानुसार माहिती शिवाय विद्यार्थांना परत आणण्यावर निर्बंध आहे. विना परवानगी ते विद्यार्थी परत आले तर त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) आणि त्यांचा शिक्षण प्रवेशही रद्द केला जाऊ शकतो. तसेच त्यांना पुन्हा देशात प्रवेश मिळणे अथवा शिक्षण प्रवेश मिळणे थांबविले जाणार आहे. यातील अनेक विद्यार्थांसमोरील मोठे संकट म्हणजे त्याचा व्हिसा सुद्धा संपला असून त्यांनी नवीन व्हिसा मिळण्यासाठी संबंधित कॉलेज आणि संस्थेच्या अनुमतीने अर्ज दाखल केला आहे. मात्र, कोरोनाच्या संक्रमणाच्या पाश्वभुमिवर या संबंधी काही निर्बंध लादले असून व्हिसा मिळायला आडकाठी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com