CoronaVirus : बुलडाणेकरांनी सोडला सुटकेचा श्वास; तो रुग्ण निगेटीव्ह

corona .jpg
corona .jpg

बुलडाणा : कोरोना संशयित व्यक्तीचा बुलडाण्यात मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी दिली आणि बुलडाणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

येथील सामान्य रुग्णालयात सौदी अरेबियामधून आलेला एक रुग्ण शनिवारी दुपारी भरती करण्यात आला होता. अचानक त्रास वाढल्याने सदर व्यक्तीचे दुपारी 4.20 ला निधन झाले. यानंतर मात्र सगळीकडे हा मृत्यू कोरोनामुळे झाला की, काय अशा शंका-कुशंका सुरू झाल्या. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मेसेजेस जाऊ लागले. त्यामुळे शहरासह जिल्हाभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तातडीने या व्यक्तीचे रक्ताचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविले होते. 

तरीही खबरदारीचे उपाय
घटनेचे गांभीर्य पाहून हा अहवाल तातडीने मिळावा यासाठी देखील आरोग्य विभागाने प्रयत्न केले. आज रविवार 15 दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सदर व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल आरोग्य विभागाला मिळाला आणि संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा श्वास सोडला. मात्र, तरीही खबरदारीचे उपाय म्हणून शासनाच्या धोरणानुसार आठवडी बाजार व शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेतच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com