CoronaVirus: शहराची गती मंदावणार !

CoronaVirus slows down the akola city
CoronaVirus slows down the akola city

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची शहरातील गर्दीच्या ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहराची गती मंदावणार आहे.


अकोला जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उघड्यावर मांस विक्री तसेच जिवंत वा मृत कोंबड्यांची विल्हेवाट सार्वजनिक ठिकाणी करण्यास साथरोग अधिनियमानुसार प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याची महानगरपालिका हद्दीत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी दिली. याशिवाय बाजारात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भात व्यापारी व व्यावसायिकांच्या संघटनांची बैठक घेवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. शिवाय दैनंदिन बाजारातही गर्दी होणार नाही याची दक्षता मनपाद्वारे घेतली जाणार आहे. आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. 
महानगरपालिका कार्यालयातील गर्दीवरही नियंत्रण आणण्यात येणार आहे. आवश्‍यक त्या सेवा सुरू ठेवताना कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी माक्स वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


...तर मंगल कार्यालय संचालकांवरच कारवाई
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे सावट असताना विवाह समारंभांचे आयोजन नजिकच्या काळात आहेत, अशा लोकांनी आपल्याकडील समारंभ पुढे ढकलावेत, अन्यथा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत समारंभ पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंगल कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहे. या काळात मंगल कार्यालयात समारंभ झाल्यास मंगल कार्यालयाच्या संचालकांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.  

खासगी शिकवणी वर्गाची होणार तपासणी
शाळा, महाविद्यालयांसोबतच वसतीगृह, खासगी शिकवणी वर्गही बंद ठेवण्याचा आदेश राज्य शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याकडे कानाडोळा करून काही खासगी शिकवणी वर्ग सुरू ठेवण्यात आले आहे. शिवाय अभ्यासिका आणि गर्दी होईल, अशा सुपरशॉपी व शहरातील मोठे प्रतिष्ठाण सुरू आहेत. हे प्रकार बंद न झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वसतीगृह, खासगी शिवगणी वर्ग व अभ्यासिकांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त वैभव आवारे व सहनियंत्रक म्हणून डॉ.फारुक शेख यांची नियुक्त करण्यात आली.


कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांसदर्भात निर्देश देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनपाकडून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी मनपाचे पथक गठीत करण्यात आले असून, हे पथक प्रत्यक्ष तपासणी करणार आहे. व्यापाऱ्यांना व व्यावासयिकांना गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल. आदेश न पाळणाऱ्यांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली जाईल. नागरिकांनीही गर्दी टाळून आवश्‍यका असेल तरच पुरेशी सुरक्षा बाळगूण बाहेर पडावे व प्रशासनाला सहाकार्य करावी, ही विनंती आहे. 
- संजय कापडणीस, आयुक्त, महानगरपालिका, अकोला
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com