हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus tension at winter session

अधिवेशनावरून शासन स्तरावरच संभ्रम आहे. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अधिवेशनासाठी मंत्रालय नागपूरला हलवावे लागते. मंत्रालय पाठवावे किंवा त्यात कपात करावी. ऑनलाईन काही कामकाज करणे शक्य होईल की नाही, याचाही विचार सुरू आहे.

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

नागपूर : हिवाळी अधिवेशनाबाबत अद्याप शासनस्तरावरून कोणत्याही स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविल्याने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे. पुढील आठवड्यात राज्याच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु, नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनास अनेकांनी विरोध दर्शविला आहे. अधिवेशनावरील खर्च आरोग्यावर करण्याचे निवेदन दक्षिण नागपूरचे कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना दिले. काही मंत्रीही अधिवेशनासाठी इच्छुक नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले अधिवेशन घेण्यासाठी आग्रही आहेत.

अधिक माहितीसाठी - Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

शासनाकडून निवास वाटप समिती गठित करण्याव्यतिरिक्त अद्याप दुसऱ्या सूचना देण्‍यात आल्या नाही. यंदा विधानभवन वगळता इतर कोणत्याही इमारतीवर खर्च करण्यात येणार नसल्याची माहिती आहे. विधिमंडळ इमारतीवर पाच कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. शासनाकडून स्पष्ट सूचना नसल्याने पहिल्या टप्प्यात फक्त सिव्हिस कामच करण्यात येणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनावरून शासन स्तरावरच संभ्रम आहे. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अधिवेशनासाठी मंत्रालय नागपूरला हलवावे लागते. मंत्रालय पाठवावे किंवा त्यात कपात करावी. ऑनलाईन काही कामकाज करणे शक्य होईल की नाही, याचाही विचार सुरू आहे.

जाणून घ्या - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

दोन आठवड्यांत कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तोपर्यंत कोरोनाचा प्रकोप किती वाढतो, यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. या सर्व गोष्टींची चाचपणी करूनच निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.

सहा नोव्हेंबरला आढावा बैठक

विधिमंडळ समिती शुक्रवारी (६ नोव्हेंबर) नागपूर येणार असून, अधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा घेणार आहे. यात विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top