esakal | Video:विनाकारण बाहेर पडला अन् मिळाला खाकीचा ‘प्रसाद’!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus:akola police on action

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचार बंदी असतानाही अकोला शहरात विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी आता सक्तीने कारवाई सुरू केली आहे. जीवनावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. विशेषतः काही तरूण गाड्या घेवून फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना खाकीचा प्रसाद दिला.

Video:विनाकारण बाहेर पडला अन् मिळाला खाकीचा ‘प्रसाद’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात 144 कलम लागू करून संचारबंदी लावण्यात आली आहे. जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी गर्दी न करता नागरिकांना बाहेर पडण्याची सुट देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना त्याचे सबळ कारण द्यावे लागणार आहे. असे असतानाही अकोला शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी विनाकारण गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना आता त्यांच्या विरुद्ध सक्तीने करावाई सुरू करावी लागली आहे. कोणतेही सबळ कारण न देता बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे.

अकोला शहरासह जिल्ह्यात संचार बंदी आहे. अशा परिस्थितीत एकावेळी सोबत दोनपेक्षा अधिक नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. जीवनावश्‍यक वस्तू व वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्यांना पोलिस सहकार्य करीत आहेत. मात्र काही नागरिका, विशेषतः तरूण कोणत्याही कारणाशिवाय बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत व शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी होताना दिसत आहे. ज्या उद्देशाने संचार बंदी लावण्यात आली आहे, नागरिक त्या उद्देशालाच हरताळ फासताना दिसत आहेत. कोणतीही सुरक्षा न पाळता नागरिक बाहेर पडत असल्याने आशा नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे.

या ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांवर बरसले दंडे
डाबकी रोड : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक म्हणजे जुने शहरातील डाबकी रोड. या रोडने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी श्रीवास्तव चौकात चांगलाच चोप दिला.

गांधी रोड : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड परिसरात सर्वाधिक नागरिक रस्त्यावर दिसून येत आहे. त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कोणतीही सुरक्षा न पाळता बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे.

टॉवर चौक : टॉवर चौकातून शहरातील सर्व दिशेने नागरिक येत आहेत. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचे सबळ कारण नाही आणि सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेताना दिसत नसल्याने पोलिसांनी कडक कारवाई करीत दंडे बसरविले.

जठारपेठ चौक : उमरी, जठारपेठ, राऊत वाडी परिसरातील नागरिक जठारपेठ चौकात विनाकारण गर्दी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.

रेल्वे स्थानक चौक : अकोट फैल व शहराच्या इतर भागातून येणारे नागरिक रेल्वे स्थानक चौकात विनाकारण फिरताना दिल्याने पोलिसांनी सक्तीने करावाई सुरू केली आहे.

नेहरू पार्क चौक : येथे बाहेर गावाहून येणाऱ्या व शहरातील इतर भागातून येणाऱ्या वाहनधारकांची तपासणी करून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

सिव्हिल लाइन चौक, रतनलाला प्लॉट चौक : येथे पोलिसांनी नागरिकांची तपासणी केली. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद मिळाला. जवाहरनगर चौकातही पोलिसांच्या सक्तीच्या कारवाईचा फटका नागरिकांना बसला.


या भागात गर्दी, पण पोलिसांचा पत्ताच नाही!
शहातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या गौरक्षण रोडवर नागरिक फिरताना दिसत आहेत. मोठ्याप्रमाणावर वाहनेही या रोडवर फिरताना दिसत आहेत. मात्र त्यांना हटकण्यासाठी या मार्गावर कुठेही पोलिस दिसून आले नाहीत. या परिसरातील नागरिक काळजी घेताना दिसत नाही, तरी प्रशासनाकडूनही येथे गांभिर्याने कारवाई होताना दिसून आली नाही. 

loading image