Corporation students set Guinness Book of five World Records Amravati news
Corporation students set Guinness Book of five World Records Amravati news

जागतिक विज्ञानदिन : मनपाच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी; गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह पाच रेकॉर्ड प्रस्थापित

मांजरखेड (जि. अमरावती) : कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांनी घरी राहून विज्ञानातील विविध प्रयोग केले. यातूनच त्यांना स्पेस टेक्नॉलॉजीअंतर्गत रामेश्वर (तामिळनाडू) येथे जाण्याची संधी मिळाली. नागपूरमधील सुरेंद्रगढ मनपा हिंदी शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींने या संधीचे सोने केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एक दोन नव्हे तर तब्बल पाच रेकॉर्ड स्थापन केले. याची दखल खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे.

एक वर्षापासून कोरोनाने सर्व जग बंदिस्त केले आहे. विद्यार्थी तर शाळेपासून वंचित आहे. परंतु, त्यांचे शिक्षण वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. या काळात स्वयंपाक घरातून त्यांनी रसायनशास्त्राचे धडे घेतले. घरातील बगिच्यातून मायक्रो बायलॉजी अनुभवले, कुकरद्वारे भौतिकशास्त्र तर झाडाद्वारे जीवशास्त्र अनुभवले. यातच विषाणू म्हणजे काय? त्यावर अल्कोहोल कसं काम करते असा विविधांगी अनुभवातून त्यांनी निरीक्षण, चिकित्सक दृष्टिकोन, कल्पकता, नाविन्यता व प्रत्यक्ष प्रयोग आदी गुण आत्मसात केले. हे सर्व घरीच प्रयोग करून डिजिटल ते प्राविण्यप्राप्त बनले.

याच कालावधीत सात फेब्रुवारीला डॉ. अब्दुल कलाम फाउंडेशनद्वारा रामेश्वरम येथे अवकाशात शंभर सॅटेलाईट झेपावणार होते. या उपक्रमात मनपा शाळेतील इयत्ता दहावीतील स्वाती मिश्रा व काजल शर्मा यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेने फेमेटो सॅटेलाईट प्रकारात नवा कीर्तिमान स्थापन करून इंडिया रेकॉर्ड, आशिया रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड व गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनविला.

नितीन गडकरीद्वारा सन्मान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा या विद्यार्थिनी व शिक्षिका दीप्ती बिष्ट यांच्या मेहनतीची दखल घेत विज्ञान दिनाचे औचित्याने सन्मान केला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, शिक्षण सभापती दिलीप दवे व शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी भरले शुल्क

उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रति विद्यार्थी दहा हजार एवढे शुल्क होते. घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या विद्यार्थिनींमधील कौशल्य बघून स्पेस झोन ऑफ इंडियाने त्यांची दखल घेतली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी स्वतः या स्पर्धेत प्रवेश शुल्क न भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरले व त्यांचे गगन भरारीचे स्वप्न साकार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com