नगरसेवकाचा तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

वणी (जि. यवतमाळ) : तरुणीसोबत मैत्री करून पाच वर्षे अत्याचार करणाऱ्या नगरसेवकाला शुक्रवारी (ता. 20) अटक करण्यात आली. धीरज दिगंबर पाते (वय 29, रा. वासेकर ले-आउट) असे भाजप नगरसेवकाचे नाव आहे. गणेश सोसायटीत वास्तव्यास असलेली 22 वर्षीय तरुणी बीएस्सीला शिकत आहे. पीडित दहावीत शिकवणीसाठी जात असताना धीरज पाते हा नेहमी तिचा पाठलाग करायचा. त्याने चिठ्ठी देऊन स्वत:च्या मोबाईल नंबरवर फोन करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थिनीने त्यावेळी प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी दोघांत मैत्री झाली. बारावीत शिकत असताना त्याने मुलीला मित्राच्या घरी नेले.

वणी (जि. यवतमाळ) : तरुणीसोबत मैत्री करून पाच वर्षे अत्याचार करणाऱ्या नगरसेवकाला शुक्रवारी (ता. 20) अटक करण्यात आली. धीरज दिगंबर पाते (वय 29, रा. वासेकर ले-आउट) असे भाजप नगरसेवकाचे नाव आहे. गणेश सोसायटीत वास्तव्यास असलेली 22 वर्षीय तरुणी बीएस्सीला शिकत आहे. पीडित दहावीत शिकवणीसाठी जात असताना धीरज पाते हा नेहमी तिचा पाठलाग करायचा. त्याने चिठ्ठी देऊन स्वत:च्या मोबाईल नंबरवर फोन करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थिनीने त्यावेळी प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी दोघांत मैत्री झाली. बारावीत शिकत असताना त्याने मुलीला मित्राच्या घरी नेले. तिथे कुणीच नसल्याची संधी साधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार धमकी देऊन अत्याचार केला. तसेच लग्नासाठी दबाव टाकला. मुलीचे कागदपत्रे मिळवून फेक फेसबुक आयडी व मतदान ओळखपत्र तयार करून नगरसेवकाने त्यावर आपल्या घराच्या पत्ता टाकला. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने ही हकीकत घरच्यांना सांगितली. पीडितेच्या पालकांनी नगरसेवकासोबत संपर्क करून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पाच लाखांची मागणी केली. त्यामुळे अखेर शुक्रवारी पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नगरसेवक पातेविरुद्घ गुन्हा नोंद केला.
एका प्रकरणात सहभाग
शहरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत या नगरसेवकानेही "त्या' कार्यकर्त्याला अत्याचार करण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यावेळी नगरसेवक अटकपूर्व जामीन मिळविण्यात यशस्वी झाला होता.  

 

 

Web Title: Corporator exploit school girl