नवनिर्वाचित नगरसेवक नीलेश कुंभारे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नागपूर - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 13 हजार 73 मताधिक्‍याने निवडून आलेले तरुण नगरसेवक नीलेश कुंभारे (34) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच रिंग रोडवरील निवासस्थान असलेल्या श्रीसाईनाथनगर परिसरात शोककळा पसरली.

नागपूर - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 13 हजार 73 मताधिक्‍याने निवडून आलेले तरुण नगरसेवक नीलेश कुंभारे (34) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच रिंग रोडवरील निवासस्थान असलेल्या श्रीसाईनाथनगर परिसरात शोककळा पसरली.

कुंभारे यांना भाजपने प्रभाग 35 मधून "अ' गटातून उमेदवारी दिली होती. त्यांनी भाजप नेत्यांचा विश्‍वास सार्थ ठरवत विजय मिळवला. कुंभारे यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाल्याने खासगी रुग्णालयात 12 दिवसांपासून उपचार सुरू होते. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचाराला यश आले नाही. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार मिलिंद माने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, रमेश सिंगारे यांच्यासह नगरसेवकांनी दिवंगत कुंभारे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

ठाणे महापालिकेत लढविली होती निवडणूक
नीलेश कुंभारे यांनी नागपुरात निवडणूक लढविली आणि जिंकले. परंतु, निवडणूक लढविण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव नव्हता, असे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीवरून दिसून येते. 2012 मध्ये ठाणे महापालिकेचीही निवडणूक लढविल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीत नमूद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporator nilesh kumbhare death