पोलिस पाटील भरतीत भ्रष्टाचार ; संभाजी ब्रिगेडचे निवेदन

राजेश सोळंकी
बुधवार, 25 एप्रिल 2018

ग्राम पोलिस भरतीचा काल निकाल लागल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे लक्षात आले. लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास तोंडी परीक्षेत मात्र केवळ 6 गुण मिळतात आणि असाच घोळ अनेक गावांमध्ये झलेला दिसून येत आहे. त्यासंदर्भात अनेक उमेदवारांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱयांना भेटून न्याय देण्याची विनंती केली.

आर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रात झालेल्या पोलिस पाटील भरतीत मोठा गदारोळ झाल्याने यावर आर्वी विधानसभा क्षेत्रात संभाजी ब्रिगेडने आवाज उठवत बुधवारी (ता. २५) शासनास निवेदन सादर केले.

ग्राम पोलिस भरतीचा काल निकाल लागल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे लक्षात आले. लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास तोंडी परीक्षेत मात्र केवळ 6 गुण मिळतात आणि असाच घोळ अनेक गावांमध्ये झलेला दिसून येत आहे. त्यासंदर्भात अनेक उमेदवारांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱयांना भेटून न्याय देण्याची विनंती केली.

त्यावरून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने एसडीओंना निवेदन देऊन सदर सदोष निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत ही प्रक्रिया तत्काळ रद्द करून मुलाखत इन कॅमेरा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

तसेच जर यावर त्वरित कारवाई झाली नाहीतर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन उभे करुन अन्याय झलेल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल, असा इशारा देण्यात आला. सर्वसामान्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असून, प्रशासनास हादरा बसला आहे. 

Web Title: Corruption in Police Patil Jobs Sambhaji Brigade