नवलच की! चक्‍क साप खातो कापूस 

श्रीकृष्ण गोरे-नीलेश झाडे 
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सापाला उंदीर, घुस, बेडूक खातांना आपण बघितले का? बघितले तर असालच. कापूस खाणारा साप बधितला का? असे म्हटलं तर... काहीही बोलता का? असच काही म्हणाल. मात्र, हे खर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चक्क कापूस खाणारा साप आढळून आला आहे. त्यामुळे या सापाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

राजुरा (जि. चंद्रपूर) : 'नवलच की! चक्‍क साप खातो कापूस' हा मथळा वाचून तुमच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले असतीलच. अरे... आश्‍चर्याने बघू नका किंवा डोळेही बाहेर काढू नका! काहीही बोलता का? असच काही म्हणाल. कोणी कापूस खातो का? असेही म्हणाल. तुमचा प्रश्‍नच चुकीचा आहे, असे म्हणून विषय संपवण्याचा प्रयत्न कराल. परंतु, हे खरं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍ततील साखरवाही गावात चक्क कापूस खाणारा साप आढळून आला आहे. त्यामुळे या सापाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

 

Image may contain: outdoor

 

हेही वाचा - अबब... चोरट्यांकडे सापडले सात पिस्तूल, 118 काडतूस 

 

साप... नुसत्या नावाने भल्याभल्यांना कापरे भारतात. अशात कुणाच्या घरात, शेतात, फ्लॅटमध्ये एखादा साप घुसला तर सर्वत्र चर्चेचा विषय होऊन जातो. भयभीत झालेले लोक ती जागा सोडून दुसरीकडे पळून जातात. "साप... साप... साप...' असे ओरडत फिरतात आणि दुसऱ्यांना भयभीत करतात. त्यामुळे लोक भीतभीत साप पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी करीत असतात. "बरं झालं रे बाबा' साप आपल्या घरी आला नाही, असे म्हणून स्वत:ची समजूत काढीत असतात. दुसरीकडे भीतभीत सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा सल्ला दुसऱ्यांना देत असतात. परंतु, हाच साप दुसऱ्या कारणाने चर्चेचा विषय झाला आहे.

 

काय - Video : काळ आला होता पण..! 

 

Image may contain: outdoor
कापूस बाहेर काढताना साप 

सापाला उंदीर, घुस, बेडूक खातांना आपण अनेकदा बघितले आहे. असं घडत असताना अनेकजण गर्दीही करीत असतात. परंतु, सापाला कापूस खाताना बघितले अस म्हटलं तर कुणीही विश्‍वास करणार नाही. सहाजिकच आहे, असे कधी होत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍ततील साखरवाही गावात चक्क कापूस खाणारा साप आढळून आला आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यातील साखरवाही येथे घडलेल्या या घटनेने सर्पमित्रांच्या वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कापूस ओकणाऱ्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

एकदा वाचाच - 'पत्नी और वो'चा फेरा अन्‌ त्याने कवटाळले मृत्यूला

 

अन्‌ कापसाचे बोळे काढले बाहेर

राजुरा तालुक्‍यातील साखरवाही गावात रासेकर यांच्या घरी साप आढळून आला. रासेकर यांनी याची माहिती सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सर्पमित्रांना साप पकडतांना पोटात काहीतरी असल्याची शंका आली. सापाला समतलं जागेवर सोडल्यावर चक्क पोटातून कापसाचे बोळे बाहेर काढले. 

Image may contain: outdoor

 

काहीही - चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

 

सोशल मीडियावर व्हायरल

सापाला सहसा कापसाच्या गंजीत दडून बसणारे उंदीर, अथवा पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी जाताना आपण अनेकदा बघितले आहे. मात्र, कापूस खाण्यासाठी जाताना कधीही बघितले नाही. त्यामुळे अंदीर किंवा पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी साप कापसात गेला असावा आणि भक्ष्यासह कापूसही गिळला अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे साप कापूस खातो का असा सवालही विचारला जात आहे. 

Image may contain: outdoor

प्रश्‍नांच्या फेरी

सापाला कापूस खातांना बघून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केला. अस कस होऊ शकते, असे प्रश्‍न नागरिक एकमेकांना विचारत होते. हा कोणत्या प्रजातीचा साप आहे?, कुठे बघितला जातो?, आपल्या जिल्ह्यात कसा आला? असे अनेक प्रश्‍न नागरिक एकमेकांना विचारत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton eating snake found in Chandrapur