दरांतील घसरणीने कापूस उत्पादक धास्तावला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच घायकुतीला आलेला शेतकरी यामुळे चिंतातुर झाला आहे.

ऑक्‍टोबरपासून कापसाचा हंगाम सुरू झाला. त्यावेळी दर 5850 ते 5900 वर होता. डिसेंबरमध्ये तो हमीभावाच्या जवळ आला. शासनाने 5450 हमीदर दिले आहेत. खुल्या बाजारात दर वधारले असल्याने शेतकऱ्यांनी पणनकडे पाठ फिरवली आहे. डिसेंबरमध्ये मात्र दरामध्ये कमालीची घसरण होऊन ते 5500 च्या जवळ आलेत. जिल्ह्यात पणन महासंघाने अंजनगावसुर्जी, दर्यापूर, वरुड, अमरावती, अचलपूर, धामणगावरेल्वे व तळेगावदशासर अशी सात शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली. सातही केंद्रांवर आतापर्यंत 21 हजार 181 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. धामणगावरेल्वे व तळेगावदशासर येथे सीसीआय खरेदी करीत आहे. यंदा विभागांत सोयाबीनच्या तुलनेत कापसाचा पेरा अधिक होता. विभागांत सुमारे 10 लाख 25 हजार हेक्‍टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली. गतवर्षी ती 9 लाख 96 हजार हेक्‍टेर क्षेत्रात होती. गेल्यावर्षी भाव मात्र कमी होता. 4 हजार 880 ते पाच हजार दर क्विंटलला मिळाला. यंदा त्यात चांगलीच वाढ प्रारंभी नोंदविली गेली. 5900 रुपयांपर्यंत कापूस गेल्याने शेतकऱ्यांमध्ये कमी उत्पादनातही उभारी संचारली होती. खुल्या बाजारातील दर बघून त्यांनी पणनकडे जाणे टाळले.

Web Title: cotton farmer