कापूस जिनिंगला शॉर्टसर्किटने आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

खापा - नजीकच्या कापूस जिनिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत कापसाच्या ५० गाठींसह कंपनीतील इतर साहित्य जळून राखरांगोळी झाली, तर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आलेल्या अग्निशमन बंबने आगीवर नियंत्रण प्राप्त करण्यात यश आले. ही  घटना मंगळवारी दुपारी घडली. सौंसर येथील व्यापारी सुनील अशोक सुडा यांनी तीन वर्षांआधी परिसरातील शेतकऱ्यांना कापूसविक्रीकरिता जवळच्या पंजाब खैरी येथे कनक कॉटन इंड्रस्टीज नामक जिनिंगची स्थापना केली. या कंपनीमध्ये मंगळवारच्या दुपारी अचानक शॉर्टसर्किट झाले. कापसाच्या ५० गाठी व यंत्रासह इतर साहित्यांची राखरांगोळी होऊन जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

खापा - नजीकच्या कापूस जिनिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत कापसाच्या ५० गाठींसह कंपनीतील इतर साहित्य जळून राखरांगोळी झाली, तर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आलेल्या अग्निशमन बंबने आगीवर नियंत्रण प्राप्त करण्यात यश आले. ही  घटना मंगळवारी दुपारी घडली. सौंसर येथील व्यापारी सुनील अशोक सुडा यांनी तीन वर्षांआधी परिसरातील शेतकऱ्यांना कापूसविक्रीकरिता जवळच्या पंजाब खैरी येथे कनक कॉटन इंड्रस्टीज नामक जिनिंगची स्थापना केली. या कंपनीमध्ये मंगळवारच्या दुपारी अचानक शॉर्टसर्किट झाले. कापसाच्या ५० गाठी व यंत्रासह इतर साहित्यांची राखरांगोळी होऊन जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी काही कर्मचारी कंपनीमध्ये काम करीत होते. त्यांना हा लागलेली आग व धूर दिसून आल्याने जीवितहानी टळली. लगेच खापा, सावनेर, कोराडी येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. सलग तीन तास पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती खापा पोलिस ठाणे, तहसीलदार राजू रणवीर, मंडळ अधिकारी  भूषणवार आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Web Title: Cotton ginning fire in nagpur