जुन्या भानेगावात गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

खापरखेडा (जि. नागपूर) :  "शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत भूमिअभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने ड्रोनद्वारे जुन्या भानेगावात शुक्रवारी गावठाणातील मोजणी करण्यात आली असून हा पथदर्शी प्रकल्प सर्वत्र राबविण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे ड्रोनद्वारे मोजणीपूर्वी संबंधित प्रशासनाने भानेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला पत्र दिले होते. यादरम्यान एक दिवसापूर्वी मार्किंग करण्यात आली व ड्रोन उडविण्यात आले. ड्रोनद्वारे मोजणी घेत असताना शासन अधिनियमाप्रमाणे पेटेंट बॉर्डरवर मार्किंग करण्यात आली. प्रशासनाने एका शेतातून गावठाण मोजणीसाठी ड्रोनला उडविले. सदर ड्रोन नदीतून आजूबाजूच्या डब्ल्यूसीएल एरियातून गोल फिरवून नंतर मार्किंग उचलण्यात आली. अशा प्रकारच्या माध्यमातून भानेगाव पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला असे ग्रामस्थांना वाटू लागले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार शेती असणाऱ्याला 3 हजार चौरस फूट तर गावातील घर अथवा प्लॉट असेल तर तीन हजार चौरस फूट आणि झोपडपट्टी वाल्यांना एक हजार चौरस फूट याप्रमाणे प्रस्तावित असून शिवाय घराचे व्हॅल्युएशन वेगळे राहणार आहे. सदर उपक्रमादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भानेगावात पहिल्यांदाच गावठाण मोजणीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याची उत्सुकता होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Count by Gauthana drone