वनविभागाच्या हद्दीत दारूभट्ट्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सेलू (जि. वर्धा) : येथील सुरगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सुरू असलेल्या दारूभट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई केली. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पण, त्यांच्याकडून या संदर्भात विशेष कारवाई करण्यात आली नाही. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

सेलू पोलिसांच्या दारूबंदी पथकाच्या कारवाईने येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा टाकण्यात आला. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. असे असले तरी या वनपरिक्षेत्रात दारूभट्टीकरिता पेटविण्यात येणारे लाकूड हे आडजातसह सागवान असल्याचे दिसून आले. यामुळे या दारूविक्रेत्यांवर वनविभाग काय कारवाई करतो याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहे.
सुरगाव शिवारात धाम नदीलगत वनविभागाच्या जागेवर सापडलेल्या दारूभट्टीत एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
वनविभाग शांत का?
सध्या शासनस्तरावरून कोट्यवधी रुपये खर्चून वृक्षलागवड करण्यात येत आहे. दारू काढण्यासाठी सागवानाच्या लाकडाचा सर्रास वापर होत असताना वनअधिकारी तथा कर्मचारी शांत का, याबाबत दारूबंदी महिला मंडळाकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: country liquor news