मानवी मूल्ये रुजवा, देश आपसूकच घडेल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या बाता होत असतानाच "हॅपीनेस इंडेक्‍स'मध्ये भारत 118 वरून 140व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. जीवनातील हरविलेला आनंद परतला तरच संपन्न देश उभा राहू शकेल. भारताचा प्राचीन आधार असलेली मानवीमूल्ये रुजविल्यास राष्ट्रनिर्माणही आपसूकच साधले जाईल, असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी व्यक्त केले.

राजेंद्र माथूर स्मृती व्याख्यानाचे यंदाचे पुष्प सिसोदिया यांनी गुंफले. साई सभागृहात आयोजित कार्यक्रमात "कसे असेल येणाऱ्या भारताचे चित्र' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी वनराईचे विश्‍वस्त डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे व कैलाश अग्रवाल उपस्थित होते. राजेंद्र माथूर हे जनतेत पत्रकारितेप्रती विश्‍वास निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था साधारणत: 6 ते 7 वर्षांत दुप्पट होते. आज 2.7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे. यामुळे पुढच्या काळात भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईलच. परंतु, त्यात सामान्य जनता, महिला, विद्यार्थी, शेतकरी कुठे राहतील, महिलांना सन्मान मिळेल का, मानवी चेतना निर्माण होईल का, एकूण संसाधनांपैकी 85 टक्के भाग केवळ 15 टक्के श्रीमंतांच्या हातात आहे. अर्थव्यवस्था मोठी झाल्यास उर्वरित 85 टक्के जनतेचा विकास साधला जाईल का, हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. देशात शिक्षण मंत्रालयच नाही. मानव संसाधन विकास विभागामार्फत ही जाबाबदारी सांभाळली जात आहे. यामुळे विद्यार्थी संसाधन रूपात विकसित होत आहेत. भविष्याकडे बघताना सर्वांनी मिळून निश्‍चित ध्येय ठरविणे आवश्‍यक असल्याचेही मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country will happen automatically